Breaking News

गडाख लोकांची दिशाभूल करतात ः आ मुरकुटे

अहमदनगर, दि. 10, नोव्हेंबर - ज्या मुख्याधिका-यांनी देवळाली प्रवरा राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवुन दिल्याल्या मुख्याधिका-यांना आम्हा शहराच्या कायापालट व्हावा  यासाठी नगरपंचायतला आणण्याचा प्रयत्न केले त्यातुन शहराचा विकास होईल त्याच मुख्याधिका-याला माजी लोकप्रतीनिधी काळे फासण्याचा ईशारा देत आहे ही बाब विकासक ामाला बाधा आणणारी असल्याचे आ.मुरकुटे म्हणाले यापुढे बोलताना आ.मुरकुटे म्हणाले की गडाख स्वतांच्या काळातील भष्टाचार झाकण्यासाठी ज्या ठेकेदारांनी नावांनी गडाख क ांगावा करीत आहे. आत्तापर्यंत सर्व कामे त्यांच्या काळात ह्या ठेकेदाराला मिळाली आहे
त्या वेळेस त्यांनी ठेकेदारास वेगवेगळ्या मागण्या केल्या त्याची सर्वांनी माहीती आहे आमच्या ताब्यात नगरपंचायत असताना ठेकेदाराला काम दिले नाही शहरात होणारे मोठ मोठी  विकास कामे त्यांच्या डोळ्यात खुपत आहे.
शहराला एवढे वर्षे खेड्याचे स्वरूप गडाखांनी आणले आहे ते आता बदलत असल्याने त्यांना नैराश्यतुन ते आमच्यावर टिका करत आहे
ग्रामपंचायत काळात ही पाणी योजना दुरूस्ती कामाकरीता ठेकदाराची नेमणुक देखील गडाखांच्या आधिपत्याखालील तत्कालीन ग्रामपंचायतीने केली होती काम त्या कार्यकाळात पुर्ण  होऊन त्याचे हस्तांतर देखील त्यांच्याच काळात झाले त्याचे सुमारे 1 कोटी 67 लाखाचे बील त्यांच्याच काळात काढल्याची नोंद ग्रामपंचायतीत आहे शहरातील विकास कामाची  मोठा निधी पाहता व कामात येत असलेला पारदर्शिपणा पाहुन त्यांना हे सहन होत नसल्याचे यावेळी आ.मुरकुटे म्हणाले पाणी योजना सहविविध बिनबुडाचे आरोप करून ते लोकाना  दिशाभुल करीत आहे.
संबधीत पाणी योजना दुरूस्ती कामाची चौकशी सूरू असुन त्याचा अहवाल लवकरच समोर येईल आणि अहवालाच्या पाहणीप्रमाणे कार्यवाही होईल.