Breaking News

महाजनांवर गुन्हा दाखल करा : नवाब मलिक

मुंबई : स्वसंरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर करत वन्यजीव कायदयाचा भंग करणारे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. 



चाळीसगाव तालुक्यातील वरखेडेमध्ये नरभक्षक बिबटयाला मारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्याचवेळी सरकारमधील मंत्री गिरीष महाजन स्वत:च्या संरक्षणाला दिलेली बंदूक घेऊन बिबटयाला मारायला बाहेर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार आक्षेप घेतला आहे. गिरीश महाजन यांनी स्वसंरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर केला असून त्यांनी वन्यजीव कायदयाचे उल्लंघन केले आहे. 

त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन लगेचच खटला चालवावा अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान, भाजप मंत्री गिरीष महाजनांवर सरकार कारवाई करणार नसेल तर आम्ही दिल्लीतील संबंधित नियुक्त अधिकार्‍याकडे तक्रार करणार असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.