Breaking News

स्वपक्षातूनच भाजपवर टीकेची झोड...

भाजप सत्तेत आल्यापासून मागील तीन वर्षांच्या काळात विरोधकांची कामगिरी पार खालावली होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून विरोधकांमध्ये उत्साहाचे भरते आले असून, भाजपला आपण शह देऊ शकतो, हा कमालीचा आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. त्यामुळे आता विरोधक सक्रिय झाल्याचे चित्र आहे. त्यांच्या रणनितीमुळे भाजपला कडवे आव्हान निर्माण होत असून, भाजपची पुढची वाटचाल आता सोपी नाही, याचा प्रत्यय भाजपला आता येऊ लागला आहे. 


गुजरातमध्ये एकहाती सत्ता आणू, याची स्वप्ने भाजपला पडत होती. मात्र काँगे्रसला उत्साहाचे भरते आले असून, राहूल गांधी व काँगे्रसची टीम भाजपला प्रतिउत्तर देत कडवा विरोध करू लागली आहे. गुजरातमधील निवडणूकीत काँगे्रसने प्रचारात घेतलेली आघाडी ही भाजपला उरात धडकी भरवणारी आहे. तर दुसरीकडे स्वपक्षांतून होणारी टीका ही भाजपचे खच्चीकरण करणारी आहे. भाजपचे माजी मंत्री अरूण शौरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवरच थेट टीकेचे झोड उठवत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करून भाजपने चूक केल्याची टीका केली. 

त्यामुळे भाजप मध्ये सगळे आलबेल असल्याचे चित्र सध्या तरी नाही. मात्र सध्या सत्ता हातात असल्यामुळे टीकेचा सुर कमी आहे. मात्र थेट मोदी यांच्यांवर टीका करत, मोदी स्वत:च्या स्वार्थांसाठी राजकारण असल्याची टीका ही भाजपच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. तर दुसरीकडे, राज्यात देखील सगळ आलबेल आहे, अशातला काही भाग नाही.सेनेची टीका सुरूच असून, मित्रपक्ष कायमचेच दुखावले आहे. विधानपरिषद निवडणूकींसाठी सर्वच पक्षांनी कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. 

मागील- एक-दोन महिन्यांपासून काँगे्रस पक्षात उत्साहाचे भरते आले असून, सत्ताधारी भाजपचा आपण पराभव करू शकतो, असा आत्मविश्‍वास नांदेड महानगरपालिकांमुळे काँगे्रसमध्ये निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे काँगे्रसचे उपाध्यक्ष राहूल गांधी देखील जोमात असून, आपल्या वक्तृत्वशैली विकसित करत, भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकतो, असा आत्मविश्‍वास काँगे्रसमध्ये निर्माण झाला आहे. 

त्यामुळे 7 डिसेंबर रोजी होणार्‍या विधानपरिषदेच्या जागेसाठी काँगे्रसने कंबर कसली आहे. तसेच या पोटनिवडणूकीत काँगे्रसला अदृश्य हात मदत करणार असल्याचे काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केल्यामुळे सेनेतील की भाजपचे आमदार काँगे्रसला मतदान करतील का? असा अनेक प्रश्‍न निर्माण होत असले, तरी याचा फैसला 7 डिसेंबरला होणार आहे. 

भाजपला आव्हान देत कायम टीकात्मक भाषा शिवसेनेने सुरू ठेवल्यामुळेंच या पोटनिवडणूकीत देखील सेना भाजपला मतदान करणार का? हा प्रश्‍नच आहे. वास्तविक नारापयण राणे यांना उमेदवारी देऊ नये, यासाठभ सेनेने जंगजंग पछाडले, त्यामुळेच भाजपला माघार घेत प्रसाद लाड यांना उमेदवारी द्यावी लागली. प्रसाद लाड यांचे नाव स्पर्धेत नसतांना देखील त्यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपमध्येच नाराजीचा सुर आहे. 

भाजपचे निष्ठावंत माधव भंडारी, शायना यांचे नावे चर्चेत होते. मात्र काही वर्षांपूर्वी भाजपात दाखल झालेले प्रसाद लाड यांना उमेदवारी देऊन भाजपाने एका दगडात दोन पक्षी मारले. भाजप सध्या आयात केलेल्या उमेदवारांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणत आहे. 

तर भाजपमधील निष्ठावंतच दुखावले जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये यादवी माजू शकते, तही वादळापूर्वीची शांतता असल्याचेच आता भाजपच्या गोटातून बोलले जात आहे. तर दुसरीकडे काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रसचे संख्याबळ पाहता हा विजय त्यांच्यासाठी सहज शक्य नाही. त्यामुळे या निवडणूकीत कोणत्या उमेदवाराची मते फुटतात, यावर पुढील गणिते निश्‍चित ठरणार आहे.