Breaking News

घनश्याम भतीजा हत्या : पप्पू कलानीसह सात जणांची निर्दोष मुक्तता.

कल्याण, दि. 19, नोव्हेंबर - इंदर भतीजा हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले माजी आ. पप्पू कलानीसह सात जणांची घनश्याम भतीजा प्रकरणात कल्याण विशेष सत्र न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली.

फेब्रुवारी 1990 मध्ये उल्हासनगरमध्ये भाजपचे पदाधिकारी घनश्याम भतीजा यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात कलानींसह नरेंद्र रामसिंघाणी, बाबा गैब्रियल, बच्ची पांडे, अर्षद शेख, रिचर्ड आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात त्यांना अटकही करण्यात आली होती.