आ. गणपत गायकवाड यांना पुजारी गटाकडून खंडणीसाठी धमकी; तक्रार दाखल.
कल्याण, दि. 19, नोव्हेंबर - कल्याण पूर्वेचे आमदार आणि केबल व्यावसायिक गणपत गायकवाड यांना 15 नोव्हेंबर रोजी सुरेश पुजारी या गुंडाने धमकी देत 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली. या संदर्भात आ. गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनाही खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती.
50 लाख दे, नाही तर वाईट परिणाम होतील, असा धमकीचा फोन आला. त्यानंतर आ. गायकवाड यांनी पोलिसात तक्रार केली. गँगस्टर सुरेश पुजारीने मलेशियात बसून ठाणे व परिसरातील व्यापारी, बांधकाम व्यावसायिकांना धमकावून खंडणी वसूल करण्याचे सत्र सुरु केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आ. गायकवाड यांना दिलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणावर ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने करडी नजर ठेवली आहे.

आठवड्याभरापूर्वी कल्याण पश्चिमेतील हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी यांनाही गँगस्टर पुजारीकडून धमकावण्यात आले होते. शेट्टी यांना फोन करणार्याने आपण सुरेश पुजारी बोलत असल्याची ओळख दिली. ‘बर्या बोलाने 25 पेट्या टाक नाही तर ढगात पाठवीन’, अशी धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आली होती.