भरदिवसा अपार्टमेंटमध्ये घरफोडी, एक लाखाचा ऐवज लंपास
सांगली, दि. 21, नोव्हेंबर - सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील बंद घर भरदिवसा सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख 27 हजार रू पयांसह तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयानजीक ही घटना घडली. या घटनेमुळे सांगली शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.
शासकीय रूग्णालयानजीक असलेल्या गारपीर चौक परिसरातील श्री अपार्टमेंटमधील सागर शिंदे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीची ही घटना घडली. सागर शिंदे आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरात कोणीही नव्हते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरचे कुलुप तोडून घरात प्रवेश के ला व ही चोरी केली.
सागर शिंदे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरी परतल्यानंतर चोरीची ही घटना उघडकीस आली. त्यांनी तातडीने ही घटना सांगली शहर पोलिसांना कळविली. या घटनेची मा हिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरूवात केली. अज्ञात चोरट्यांनी सागर शिंदे यांच्या घरातील रोख 27 हजार रूपये व तीन तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला. सांगली शहर व परिसरातील घरफोडीच्या सलग अशा घटनांनी सांगलीकर हादरून गेले आहेत.