Breaking News

शिवूर येथे सोनाराचे दुकान फोडले

औरंगाबाद, दि. 21, नोव्हेंबर - वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथील सोन्याच्या दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला. यात दुकानातील 20 हजारांचा ऐवज चोरीला गेला. दुक ानाच्या बाजूला असलेल्या घरासमोर झोपलेल्या तरूणाचा मोबाईल चोरट्यांनी पळविला. 

ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दुपारपयरत शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संजय देवकर असे दुकानदाराचे नाव आहे. शिऊर बंगला येथे अंबिका नावाचे सोन्याचे दुकान आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील अंगठी, हार असा 20 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी चोरी करून जाताना दुकानाच्या बाजूला असलेल्या घरावरही हात साफ केला. घरात काही मिळाले नसल्याने घरात झोपलेल्या तरूणाचा मोबाईल चोरून चोरांनी घराच्या दरवाज्याची कडी बाहेरुन लावली.