अनिकेत कोथळे हत्या : खासगी रूग्णालयाचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात
सांगली, दि. 21, नोव्हेंबर - अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी चौकशीच्या फे-यात आलेल्या विश्रामबाग परिसरातील एका खासगी रूग्णालयातील सीसीटिव्ही फुटेज राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह सहा जणांना उद्या मंगळवारी पुन्हा येथील न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
सांगली शहर पोलिस ठाण्याचा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या साथीदारांच्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला होता. युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी अनिकेत कोथळे व त्याचा साथीदार पोलीस ठाण्यातून पळून गेल्याचा बनाव केला होता व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला आहे.
अटकेत असलेल्या सर्वच सहा आरोपींची इन कॅमेरा चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र हे सर्वजण तपासात असहकार्य करीत असल्याचे सांगण्यात आले. या खूनप्रकरणी आतापर्यंत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने 30 हून अधिक जणांची सखोल चौकशी केली आहे. दोन दिवसापूर्वी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील सीसी टिव्ही फुटेज नष्ट क रणार्यासही ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत युवराज कामटे याच्या सांगण्यावरून त्याने हे फुटेज नष्ट केल्याची कबुली दिल्याची चर्चा आहे.

अनिकेत कोथळे याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह घेऊन युवराज कामटे व त्याचे साथीदार विश्रामबाग परिसरातील एका बड्या खासगी रूग्णालयात गेले होते. त्या खासगी रू ग्णालयाचे सीसी टिव्ही फुटेजही राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहेत. याबाबत या खासगी रूग्णालयाच्या व्यवस्थापकाकडेही चौकशी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अटकेत असलेल्या युवराज कामटे याच्यासह अन्य सहा आरोपींची उद्या मंगळवारी पोलिस कोठडीची मुदत संपत आहे. या सर्वांना उद्या येथील न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.