शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतने दिले आरोप्लांटला प्राधान्य
आरोग्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असते शुद्ध पाणी मिळणे. असे शुद्ध फिल्टर पाणी सर्वसामान्य जनतेला मिळावे यासाठी ग्रामीण जनता आग्रह धरत असुन त्यासाठी ग्रामपंचायतनेही आरो प्लान्ट उभारणीस प्राधान्य देत आहेत.शासनाने १४व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला वर्ग केल्याने व तो निधी कोणत्या कामासाठी ( सार्वजनिक विकास कामे ) खर्च करावयाचा यांचा पुर्ण अधिकार ग्रामस्थांना दिला आहे.
त्यासाठी ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर होणे गरजेचे असुन आवश्यक कामांना आधी प्राधान्यक्रम देण्याचा अधिकारही देण्यात आला आहे.चालू वर्षात हा निर्णय घेण्यात आला.लोकसंख्या आधारे दहा लाखांपेक्षा जास्त निधी जवळपास सर्वच ग्रामपंचायतीला उपलब्ध झालात्यातून अनेक ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या.
त्यात शुद्ध फिल्टर पिण्याचे पाणी गावांतील सर्वच कुटुंबाना परवडेल अशा किमतीत देण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यासाठी फिल्टर आरोप्लांट बसवण्यास अनेक ग्रामपंचायतीने प्राधान्यक्रम दिला . अनेक ग्रामपंचायती प्लांट सुरू करण्याच्या तयारीत आहे.नागरिकांना शुद्ध फिल्टर पाणी मिळणार आहे . त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीला अधिकचे उत्पन्न मिळवून देण्याचा एक अतिरिक्त स्रोत कायमचा तयार झाला आहे. खाजगी शुद्ध पिण्याचा जार वीस लिटरला कमीतकमी ३० रूपये द्यावे लागतात. तर हाच जार
उन्हाळ्यात ५० रुपयाला ग्राहकांना घ्यावा लागतो. मात्र ग्रामपंचायतीच्या आरो प्लांटमुळे हाच २०रूपयाचा जार केवळ५-१०रूपयात मिळणार आहे.गामस्थांना कमी दरात शुद्ध फिल्टर पाणी व ग्रामपंचायतीला अधिकचे उत्पादन देणारे साधन असा दुहेरी फायदा ग्रामपंचायतीला होत असल्याने अनेक ग्रामपंचायती सध्या गावात आरोप्लांट उभारण्यास प्राधान्य देत आहेत.अनेक गाव सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत सहभागी आहेत. मात्र योजना व्यवस्थित सुरू राहतं नसल्याने घोटाळे ,विज बिलाअभावी वारंवार बंद होणं योजनेचे पाणी महिन्यातुन १५-२०दिवस मिळत बिल मात्र महिन्याचे भरावे लागते त्यात ग्रामपंचायतीची थकबाकी वाढली त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीने योजनेतून अंग काढून घेतले आहे.
१४व्या वित्त आयोगाच्या निधीतून आपल्याकडे असलेल्या उपलब्ध पाणी स्तोत्र यातुन शुद्ध फिल्टर पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ग्रामपंचायती सध्या गावातआरोप्लांट उभारत आहेत.त्याने गावे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी स्वयं पुर्ण होत आहेत.
-ग्रामपंचायतींना मिळाली नवीन उद्योगाची संधी
चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला चांगला निधी उपलब्ध होत आहे.त्यातुन मुलभूत गाव विकासाची कामे करत असताना ग्रामपंचायतींनी उत्पादनाची नवनवीन साधने शोधावित, आरओ प्लांटने ग्रामस्थांना शुद्ध पाणी तर ग्रामपंचायतीला रोख स्वरूपात निधी उपलब्ध होणार आहे.गावपातळीवर देवस्थान,
त्यांच्या इनामी जमिनी जर ग्रामपंचायतीने ताब्यात घेऊन व्यवस्था पाहिली तर यातुन येणारे उत्पन्न गावविकासाला मोठी चालना देऊ शकते . तर इतर उद्योग उभारण्यासाठी ग्रामपंचायतीला शासकीय भूखंड उपलब्ध असल्याने उतपादनचे प्रकल्प सुरु करण्यास मोठी संधी ग्रामीण भागात आहे .- संजय काळे,अध्यक्ष - जगदंबा माता सामाजिक विकास प्रतिष्ठान,भविनिमगाव .