Breaking News

दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. थेट जनतेमधून सरपंच निवड, उमेदवारास पक्ष चिन्ह वापरण्यास बंदी या नवीन निकषानुसार पहिल्या टप्प्यातीलग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. आता दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

जानेवारी , फेब्रुवारीमध्ये मुदत संपणाऱ्या ६७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम काल राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. या सर्व गावांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

जानेवारीमध्ये ५९ तर फेब्रुवारीमध्ये ८ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. राज्य निवडणूक आयोगाने या सर्व ( ६७) ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रम
१)दि. २४ नोव्हेंबर तहसीलदार नोटीस प्रसिद्ध करतील.

२)दि. ५ ते ११ डिसेंबर अर्ज सादर करण्याची मुदत

३) दि. १२ डिसेंबर अर्ज छाननी .

४) दि. १४ डिसेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत, याच दिवशी मतदारयादी प्रसिद्ध होऊन चिन्हवाटप केले जाणार आहे.

५) दि. २६ डिसेंबर प्रत्यक्ष मतदान मतदान


निवडणूक होणारी प्रमुख गावे
* राहाता-वाकडी, दुर्गापूर, पिंपरी निर्मळ, दाढ बुद्रूक, श्रीरामपूर-उंदीरगाव, उक्कलगाव,

* नेवासा-रस्तापूर, पाचेगाव, शेवगाव-शहरटाकळी, बालमटाकळी, बोधेगाव, मुंगी,

* श्रीगोंदा-कोळगाव, विसापूर, पेडगाव,

* नगर-निंबोडी, देऊळगावसिद्धी, मेहकरी, हिवरेझरे, अरणगाव,

* राहुरी-सडे,

* संगमनेर-आश्‍वी खुर्द, आश्‍वी बुद्रूक