Breaking News

समाजिक संस्था व लोककलावंत समाज जागृतीचे कार्य करतात -खा. लोखंडे


सामाजिक संस्था प्रत्यक्ष तळागाळापर्यंत जाऊन खर्या अर्थाने समाजाभिमुख कार्य करीत आहे. समाजातील सर्व घटकांना जागृत करण्याचे कार्यसामाजिक संस्था व लोककलावंत करीत आहेत. लोककला आपल्या संस्कृतीचा वारसा असून, या लोपपावत चाललेल्या लोककलेला प्रोत्साहन देण्याचीगरज असल्याची भावना खा.सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केली.

नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, रयत प्रतिष्ठान व जय स्वयंसेवी संस्था संघटना आयोजित तिसर्याराज्यस्तरीय लोककला महोत्सवाच्या समारोप प्रसंगी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अॅड.प्रशांत साळुंके, गुलाबराव खरात, नेहरुयुवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, अशोक थोरे, अॅड.भानुदास होले, अॅड.महेश शिंदे, अॅड.अनिता दिघे, पोपट बनकर, मंगल भुजबळ,विद्या शिरसागर, रोहिणी थोरात, शिवाजी नवले, नयना बनकर, कर्नल बहादुरसिंह, भिमराव उल्हारे, योगीता देवळालीकर आदि उपस्थित होते.

प्रास्ताविकात मुख्य संयोजक अॅड.महेश शिंदे म्हणाले की, ज्या सामाजिक संस्था कृतीशीलपणे कार्य करतात ते खर्या अर्थाने शासकीय धोरण व योजनानिस्वार्थीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवित आहे. अशा कृतीशील संस्थांच्या कार्याची दखल शासन स्तरावर घेतली गेली पाहिजे. संस्थांना अनुदानमिळाल्यास त्यांना आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचे सांगून, लोककलेला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बाबाजी गोडसे म्हणाले की, नेहरु युवा केंद्राचा वर्धापन दिन लोककला महोत्सवाच्या माध्यमातून साजरा होत आहे. कोणत्याही प्रकारचे अनुदाननसताना सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मतदार जागृती, स्वच्छता अभियान, मुलगी वाचवा...मुलगी शिकवा आदि विविध शासनाचे उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले.