Breaking News

पिंपरीत काँग्रेसचे नोटबंदी विरोधात आंदोलन

पुणे, दि. 08, नोव्हेंबर - नोटाबंदीला उद्या, बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, दहशतवाद आणि काळा पैसा बाहेर आला नसल्याचा आरोप करत नोटाबंदीच्या  निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने पिंपरीत जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आज, मंगळवारी जनआक्रोश  आंदोलन झाले. 
यावेळी काँग्रेस नेते सचिन साठे म्हणाले, एक वर्षांपूर्वी केलेल्या नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही. देशभर शेकडो गरीब नागरिकांना मात्र प्राण गमवावे लागले. शेतक-यांना  कर्ज माफी दिल्याच्या कोट्यवधी रुपयांच्या फसव्या जाहिराती देऊन जनतेची दिशाभूल करण्यात आली. सोळा महिन्यात एकोणीस वेळा गॅस सिलेंडरची भाववाढ करण्यात  आली.राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दारुची विक्री वाढविण्यासाठी दारुच्या बाटलीला महिलांचे नाव द्या असे वक्तव्य करुन महिला भगिनींचा अपमान करतात. त्यामुळे त्यांना  मंत्री म्हणण्याची लाज वाटत असल्याचेही साठे म्हणाले.