Breaking News

जावयाला जाब विचारणा-या सास-याचा खून

नांदेड, दि. 08, नोव्हेंबर - सासरी मुलीला मारहाण होत असल्या बददल जाब विचारणा-या पित्याचा जावाई व त्याच्या नातलगांनी मारहाण करून खुन केला. नसरीन हिचे वडील  अफजल बेग चाँद बेग व भाऊ रहेमान बेग हे दोघे जण तिचा पती करीम यास बोलण्यास गेले होते. करिम हा नसरीनला मारहण करत होता म्हणून ते त्या बाबत चर्चा करणार  होते.मात्र, करिम याने शिव्या दिल्याने चर्चा झाली नाही नंतर करिम आपले दोघे भाऊ घेवुन अफजल बेग यांच्या घरी गेला तेव्हा बेग यांच्यासह हाजी बेग व रहेमान बेग यांना क रिमच्या भावांनी रॉडने मारहाण केली.त्यात जखमी असलेल्या अफजल बेग चाँद बेग (60) यांना उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले होते. उपचारा दरम्यान अफजल बेग  चाँद बेग यांचा मृत्यू झाला.