Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांचे क्षत्रियत्व नाकारण्याचा प्रयत्न...


ण्याच्या शिवशक्ती संगम मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने छत्रपति शिवाजी महाराज यांची प्रतिमा अत्यंत खोडसाळ 

पध्दतीची वापरली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर या देशात हिंदु बहुजनांना मावळा बनवून छत्रपति शिवाजी महाराजांनी समतेचा विचार आणि तलवारीची धार या दोन गोष्टींमुळे सत्ता हातात घेतली. देशाच्या इतिहासात खूप शतकांनी शिवाजी महाराजांनी या देशातील हिंदु बहुजनांचे राज्य स्थापन केले. परंतु हे राज्य संत चळवळीच्या समतेच्या विचारांवर आधारलेले होते. तलवारीच्या जोरावर महाराजांनी एकापाठोपाठ अनेक किल्ले ताब्यात घेतले तरी व्यक्ती आणि समाजाच्या सांस्कृतिक चालीरीतींत आणि धर्म पध्दती यावर त्यांनी कधीही प्रहार केला नाही. म्हणूनच छत्रपति शिवाजी महाराजांची मावळे हे त्या काळातील अस्पृश्यांपासुन तर शूद्र आणि मुस्लिम समुदायापर्यंत अनेक शूरवीरांचा त्यात समावेश होता. मात्र पुण्यात 3 जानेवारीला झालेल्या आरएसएस मेळाव्यात शिवाजी महाराजांची प्रतिमा तलवारविहीन दाखवून त्यांचे क्षत्रियत्त्व नाकारण्याचा आधुनिक काळातला नवा ब्राह्मणी प्रयोग करण्यात आला. शिवाजी महाराज हे क्षत्रिय आहेत आणि त्यांना राजा होण्याचा अधिकार आहे असा दावा जेव्हा महाराजांनी केला तेव्हा महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी ते क्षत्रिय नाहीत म्हणून त्यांचा राज्याभिषेक होवू शकत नाही अशी भूमिका मांडली होती. त्यामुळेच छत्रपति शिवाजी महाराजांना उत्तर भारतातून गागाभट्ट सारख्या ब्राह्मण पुरोहिताला बोलवावे लागले. धर्म आणि संस्कृतिशी ब्राह्मण पुरोहितांचा काहीही संबंध नसल्यामुळेच गागाभट्टने छत्रपति शिवाजी महाराजांकडून  मोठ्या प्रमाणात धन लुटून नेले. मात्र गागाभट्टने केलेला राज्यभिषेक हा शिवाजी महाराजांचा अपमान 
करणाराच राज्यभिषेक होता असा स्वत: महाराजांचा समज होता. त्यामुळेच महाराजांनी नंतर बंगलमधून निश्‍चलपुरी नावाच्या पंडिताला बोलावून आपला राज्यभिषेक घडविला. शिवाजी महाराजांच्या क्षत्रियत्वाचा इतिहास दडपूण टाकण्यासाठी किंवा आजही त्यांचे क्षत्रियत्व नाकारण्यासाठी त्यांच्या हातातील तलवार काढून आरएसएसने त्यांची प्रतिमा वापरण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न म्हणजे हिंदु बहुजनांचे क्षत्रियत्व नाकारण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे बहुजन प्रतिपालक असलेल्या छत्रपति शिवाजी महाराजांचा हा अपमान महाराष्ट्रातील मावळे यापुढे सहन करु शकत नाही. छत्रपति शिवाजी महाराजांची यापूर्वी परधर्मीद्वेष्टी प्रतिमा निर्माण करुन त्यांचे ब्राह्मणी करण करण्याचा प्रयत्न ब्राह्मणांनी केला. हिंदु बहुजनांचे इतिहासाचे वाचन त्या 
काळात कमी असल्यामुळे त्या प्रयत्नात ब्राह्मण काहीशे यशस्वी झाले. परंतु आज महाराष्ट्रातील हिंदु बहुजन असणारे मावळे महाराजांचा पूर्ण इतिहास जाणत असुन पुरंदरेंनी मांडलेला तथाकथित इतिहास नाकारण्याचे ज्ञान हिंदु बहुजनांना झाले आहे. त्यामुळे 3 जानेवारीला संघाने छत्रपति शिवाजी महाराजांचे क्षत्रियत्व नाकारणारी प्रतिमा वापरुन महाराजांचा घोर अपमान करण्याचाच प्रयत्न केला आहे. छत्रपति शिवाजी महाराजांचे वारस म्हणविले जाणार्‍या मराठा समाजाने यावर आपली प्रतिक्रिया द्यायला हवी. ज्यांनी महाराजांच्या नावावर राजकीय सत्ता यथेच्छपणे भोगली त्यांनी यावर काय प्रतिक्रिया द्यावी हा त्यांचा प्रश्‍न आहे. परंतु आम्ही हिंदु बहुजन असणारे मावळे म्हणून महाराजांची तलवारविहीन प्रतिमा निर्माण करुन संघाने त्यांचे क्षत्रियत्व नाकारण्याचा जो अश्‍लाघ्य प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. यापुढील काळामध्ये महाराजांची अशी प्रतिमा कोणी लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला महाराष्ट्रातील हिंदु बहुजन मावळे नक्कीच उत्तर देतिल याविषयी आम्हाला विश्‍वास आहे. राजकीय सत्तेच्या माध्यमातून संघाने हिंदु बहुजनांचे  आराध्य असलेल्या छत्रपति शिवाजी महाराजांचा इतिहास आणि प्रतिमा पुन्हा विकृत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. जे हिंदु बहुजन असणारे मावळे यापुढील
काळात सहन करु शकणार नाहीत.