परभणी, दि. 08, नोव्हेंबर - आर्थिक अडचणीमुळे सुमित्रा भगवानराव राखोंडे या अंगणवाडी सेविकेने आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर सेविका ही जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथे अंगणवाडीचे काम करीत होती. पगारवाढीच्या मागण्यातील आंदोलनात तिचा सहभाग होता. याप्रकरणी पोलिसांनीअकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.