डोंगरे संस्थेला नेहरु युवा केंद्राचा स्वच्छता हीच सेवा पुरस्कार प्रदान संस्थेला नगर तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा बहुमान
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगांव वाघा येथील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेस नेहरु युवा केंद्र व जिल्हा प्रशासनाच्या वतीने नगर तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा स्वच्छता हीच सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
टिळक रोड येथील माऊली सांस्कृतिक भवन येथे झालेल्या लोककला महोत्सवात खा.सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सचिव मंदाताई डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, पै.संदिप डोंगरे यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी अॅड.प्रशांत साळुंके, गुलाबराव खरात, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, अशोक थोरे, अॅड.भानुदास होले, अॅड.महेश शिंदे, अॅड.अनिता दिघे, पोपट बनकर आदि उपस्थित होते.
नेहरु युवा केंद्र व जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता हीच सेवा या उपक्रमातंर्गत नगर तालुक्यात प्रभावीपणे स्वच्छता अभियान राबविले. तसेच स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, मतदार जागृती, कॅशलेस, महिला सक्षमीकरण व जलसंधारण बाबत जनजागृतीचे कार्य केले. या कार्याची दखल घेत संस्थेला सदर पुरस्कार देण्यात आला आहे. 8 हजार रु. स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र या पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.