औरंगाबाद, दि. 09, नोव्हेंबर - औरंगाबाद जिल्हा काँग्रेस समितीनं नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त निषेध व्यक्त करण्यासाठी सामूहिक मुंडण आंदोलन केले. जिल्हाधिकारी क ार्यालयासमोर केंद्र सरकार व राज्य सरकारचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. सिल्लोडचे आमदार व जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार क ल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी अन्य कार्यकर्त्यांनी मुंडण करत निदर्शने केली. मराठवाड्यात जालना, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आदी ठिकाणीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे, घोषणा, निदर्शने, काळा केक कापणे अशा प्रकारचे आंदोलन करून नोटाबंदीचा निषेध केला. नोटाबंदीने सर्व सामान्यांवर विपरित परिणाम झाला. अर्थ व्यवस्थेला खिळ बसल्याचा आरोप करीत काँग्रेस-राष्ट्रवादीने शहरभर आंदोलने केली. काँग्रेस आ. अब्दुल सत्तार, जिल्हाध्यक्ष नामेदवराव पवार, सुभाष झांबड, माजी आ. कल्याण काळे, नितीन पाटील, जि.प. सदस्य कलीम पटेल, तालुकाध्यक्ष रामकृष्ण शेळके, जितेंद्र देहाडे, संदिप बोरसे, नितीन काळे, त्रिंबक नागरे, डॉ. दिलदार बेग, सय्यद कलीम यांच्यासह 15 ते 20 कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन केले. जालना येथे राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष सलीम पटेल वाहेगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 12 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळा केक कापण्यात आला.