डॉ. विलास वांगीकर यांना जीवन गौरव पुरस्कार
औरंगाबाद, दि. 09, नोव्हेंबर - महाराष्ट्र नेत्र तज्ज्ञ संघटनेतर्फे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ औरंगाबाद केंद्राचे सीईओ डॉ. विलास वांगीकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय नेत्रतज्ज्ञांच्या परिषदेत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, पदमश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. प्रकाश मरारो, डॉ. आदित्य केळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
