बोहर्डीत पेट्रोल पंपावर दरोडा; अडीच लाखाची रोकड लंपास
जळगाव, दि. 26, नोव्हेंबर - भुसावळ येथील राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी येथील नांगरणी पेट्रोल पंपावर दुचाकीने आलेल्या तिघांनी सिनेस्टाइल दरोडा टाकत पिस्तूल रोखून सुमारे अडीच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास येथे घडली. यात रोकड न देणार्या व्यवस्थापकाच्या डोक्यात रॉड मारून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून दरोडेखोरांच्या जिल्ह्यात वाढणार्या उच्छादामुळे सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे.
भुसावळचे नगरसेवक रमेश नागराणी यांचा भुसावळ-मुक्ताईनगर महमार्गावर बोहर्डी गावाजवळ नागराणी पेट्रोलियम या नावाने पंप आहे. पहाटे पावणेपाच ते पाच वाजेदरम्यान दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी 50 रुपयांचे पेट्रोल भरले. पंपावर व्यवस्थापक व एक कर्मचारी जागा असताना व दुसरा झोपला असताना दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत गल्ल्यातील सुमारे अडीच लाखांची रोकड काढून पळ काढला. सुरुवातीला रोकड न देणा-या पंपावरील व्यवस्थापक प्रभाकर खंडारे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. लूटीनंतर दरोडेखोर पसार झाले.
पेट्रोल पंप लुटण्याची घटना कळाल्यानंतर मुक्ताईनगरचे उपअधीक्षक नेवे, वरणगावचे सहाय्यक निरीक्षक जगदीश परदेशी यांनी धाव घेतली तर जळगाव येथून श्वाकन पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, नागराणी पेट्रोल पंपावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेजही चोरट्यांनी लांबवल्याने चोरटे हे सराईत व माहितगार असल्याचा कयास वर्तवला जात आहे.