Breaking News

कचर्‍यापासून गॅस, ऑइल, ऍक्टीवेटेड कार्बन

नागपूर, दि. 10, नोव्हेबर - दररोज निर्माण होणारा कचरा, शेतातील टाकाऊ साहित्य जगभरासाठीच आव्हान ठरले आहे. पंजाब, हरियाणामध्ये जाळण्यात येणार्‍या ऍग्रोवेस्टमुळे  राजधानी दिल्लीला गॅस चेंबर’चे स्वरूप आले आहे. या प्रश्‍नावर सहजतेने मात करणार्‍या यंत्राचे संशोधन करण्यात संजीवनी ऍग्रो मशिनरी कंपनीला यश आले आहे. या यंत्राद्वारे क चर्‍यापासून एकावेळी गॅस, ऑइल आणि ऍक्ट्रीवेटेड कार्बनची निर्मिती शक्य आहे. म्हणजेच टाकाऊ कचरा आता उत्पन्नाचे साधनही होऊ शकतो. 
संजीवनी ऍग्रो मशिनरी व विदर्भ सेल्सचे संचालक संजय क्षीरसागर, अनिल चौक यांच्यासह यंत्राचे संशोधन करणारे जितेंद्र खोले व डॉ. हेमंत धर्माधिकारी यांनी आज, गुरुवारी पत्रक ार परिषद घेऊन नवीन संशोधना विषयी विस्तृत माहिती दिली. चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर संजीवनी बायोऑईल, गॅस, कार्बन सिस्टीम यंत्र बनविण्यात यश आले आहे. फास्ट  पायरोलिसीसी सिस्टीम’चा अभ्यास करून या यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्याद्वारे एक किलो कचर्‍यापासून 400 ग्रॅम बायोऑईल, 400 ग्रॅम ऍक्टीवेटेड कार्बन आणि 200  ग्रॅम बायोगॅसची निर्मिती होते. प्रक्रिये दरम्यान निघणारे पाणी शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी फारच उपयुक्त आहे. यंत्रातून निघणार्‍या गॅसवरच हे यंत्र चालविले जाऊ शकते.  वेगळी वीज वापरण्याची गरज नाही. 27 एमआयडीसी, हिंगणा येथील संजीवनी ऍग्रो मशीनरी येथे या यंत्राचे अवलोकन करून माहिती घेता येईल.
लिकांकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधीचा खर्च केला जातो. यानंतरही कचर्‍याचे ढिगारे वाढतच आहेत. मात्र, नवीन संशोधनाद्वारे महापालिकांना कोट्यवधीचे उत्पन्न मिळू  शकते. शेतकरी बांधवांनाही या प्रकल्पाच्या मदतीने प्रतिकिलो 20 रुपयांचे उत्पन्न टाकाऊ साहित्यापासून मिळवून घेता येणे शक्य असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
या यंत्रात केवळ काच आणि मेटल वगळता अन्य कोणतेही घटक वापरता येते. रबर वापरण्यासाठी शासनाची परवानगी लागते. पण, अन्य कोणत्याही घटकाचा उपयोग करून गॅस,  ऑइल, ऍक्टीवेटेड कार्बन मिळविता येते. प्लासिटकचा वापर केल्यास ऑइल अधिक प्रमाणात मिळते संपूर्ण प्रक्रियेत कुठेही प्रदूषण होत नाही. प्लास्टिकची गंभीर समस्या सहज  सोडविणे शक्य झाले आहे.