बेल्जियमच्या क्वीन माथिल्दे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेसंदर्भातील गाण्याचे लोकार्पण
मुंबई, दि. 10, नोव्हेबर - सह्याद्री अतिथीगृह येथे युनिसेफ तर्फे आयोजित कार्यक्रमात बेल्जियमच्या क्वीन माथिल्दे यांच्या उपस्थितीत स्वच्छते संदर्भातील गाण्याचे लोकार्पण क रण्यात आले. हाथ धुण्याचे महत्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तयार केलेले हे गाणे युनिसेफ तर्फे प्रत्येक शाळांमधून सादर केले जाणार आहे. यावेळी महिला व बालविक ास मंत्री पंकजा मुंडे या प्रामुख्याने उपस्थित होत्या. दादरच्या शिवाजी पार्क लाईन अपंग मुलांच्या शाळेतील मुकबधिर विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या हावभावातून राष्ट्रगीत सादर केले.
