Breaking News

आरोपीचा कोठडीत मृत्यू; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून पोलीस महासंचालकांना नोटीस

मुंबई, दि. 10, नोव्हेबर - विश्रामबाग (जि. सांगली) पोलीस ठाण्याच्या कोठडीतील आरोपीच्या मृत्यूची दखल थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी पोलीस  महासंचालक सतीश माथूर यांना आयोगाने नोटीस बजावली आहे.
चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अनिकेत कोथळेचा पोलिसांनी दिलेल्या थर्ड डिग्रीमुळे कोठडीत मृत्यू झाला. हे प्रकरण दडपण्यासाठी संबंधित पो लिसांनी अनिकेत पोलीस कोठडीतून पळून गेल्याचे सांगितले. मात्र अधिक सखोल चौकशीत अनिकेतचा कोठडीतच मृत्यू झाल्याचे समोर आले. अखेर या प्रकरणी न्यायालयाने  आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहा जणांना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.