शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
औरंगाबाद, दि. 08, नोव्हेंबर - येथील संस्थान गणपती समोर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात चांगलाच संघर्ष पेटला. दोन्ही नेत्यांमध्ये काही कारणावरून बाचाबाची होवुन दानवे यांनी खैरे यांच्या समोर येवुन तुम्हीच मला मारा, असे म्हणत जाहीर आव्हान दिले त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
खा. खैरे आज,मंगळवारी सकाळी संस्थान गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, नगरसेवक किशोर नागरे, गिरजाराम हाळनोर, आदी कार्यकर्ते होते. त्याचवेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवेही दर्शनासाठी आले. दोघांनीही दर्शन घेऊन ते परत फिरले. तेवढ्यात गटप्रमुखांची निवड यादी दानवे यांनी खा. खैरेंना दिली. या यादीतील नावे पाहून खैरे भडकले. काय चालले तुमचे ही नावे या यादीत कशाला, असे म्हणत खैरे संतापले. त्यावर दानवेंनेही कामे आम्ही करायची अन् श्रेय मिळते इतरांना, म्हणत प्रतिसवाल केला. हा वाद वाढतच गेला. मंदिराच्या पायर्यांजवळ आलेल्या कारमध्ये खा. खैरे बसले. संतापलेल्या दानवे यांनी खैरेंच्या कारचा दरवाजा उघडला. तुम्ही इतर कार्यक र्त्यांना मला मारण्याचे आदेश देता. तुम्हीच मला मारा, असे म्हणत त्यांच्यासमोर उभे ठाकले. दानवे यांच्या पावित्र्याने उपस्थितही चांगलेच गोंधळून गेले. नरेंद्र त्रिवेदी व इतर कार्यक र्त्यांनी दानवे यांना बाजूला करीत दूर नेले. त्यामुळे तुर्तास वादावर पडदा पडला असला तरी यानिमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.