तरुणीच्या घरात घुसून धिंगाणा घालणा-यांविरोधात गुन्हा दाखल
औरंगाबाद, दि. 04, नोव्हेंबर - मुकुंदवाडी परिसरातील एकोणीस वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिघांनी धिंगाणा घातला. यात तरुणीसह तिच्या भावाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्यासोबत अश्लील कृत्य केले.
याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून सोनेश चंद्रकांत बनसोडे, अजय दत्तू नरवडे आणि सुमीत जयवंत सोनवणे यांच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सोनेश याच्या दोन मित्रांसह रात्री घरात घुसला.
त्यानंतर धिंगाणा घालत लाठीने तिच्या पायावर मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या भावाला मारहाण करत मानेवर वार केले. जिवे मारण्याची धमकी देऊन तिघेही पळून गेले.