सांगली-पेठ नाका रस्त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्स्प्रेस वे नामकरणाचा इशारा
सांगली, दि. 04, नोव्हेंबर - सांगली ते पेठ नाका या रस्त्याची येत्या दोन महिन्यात तात्काळ दुरूस्ती न झाल्यास या रस्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्स्प्रेस वे असे नामकरण करण्याचा इशारा सांगली- पेठ नाका रस्ता बचाव कृती समितीच्यावतीने शुक्रवारी आयोजित बैठकीत देण्यात आला. याशिवाय बहुचर्चित सांगली- कोल्हापूर या रस्त्याला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देतानाच सांगली महापालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांनाही सार्वजनिक बांधकाम मंत्री, खासदार, आमदार व महापौर यांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सांगली- पेठ नाका रस्ता बचाव कृती समितीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक येथील कष्टकर्यांची दौलत येथे पार पडली. या बैठकीस सांगली जिल्हा सुधार समितीचे कार्याध्यक्ष ऍड. अमित शिंदे, सांगली महापालिकेतील स्वाभिमानी विकास आघाडीचे युवा नेते नगरसेवक गौतम पवार, काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत पाटील- मजलेकर, हमाल पंचायतीचे नेते बापूसाहेब मगदूम, सामाजिक कार्यकर्ते आशिष कोरी, शिवसेनेचे सांगली महापालिका क्षेत्र उपप्रमुख शंभोराज काटकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली शहर अध्यक्ष अमर पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके, आसिङ्ग बावा, अश्रङ्ग वांकर व हेमंत खंडागळे आदी उपस्थित होते.
प्रारंभी रस्ता बचाव कृती समितीचे मुख्य निमंत्रक तथा स्वाभिमानी विकास आघाडीचे सहसचिव सतीश साखळकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात सांगली- पेठ नाका या प्रमुख रस्त्यासह महापालिका क्षेत्रातील अन्य रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सर्वपक्षीय रस्ता बचाव कृती समितीच्या माध्यमातून एक मोठी संघटित ताकद उभी करून आंदोलन उभारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात ऐन दीपावलीच्या पहिल्या दिवशी सांगली- पेठ नाका या रस्त्यावरील खड्ड्यात दिवे लावा आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे सांगितले.
या बैठकीत उपस्थित सर्वांनीच या रस्त्यासह महापालिका क्षेत्रातील रस्त्यांबाबत तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकांचा आढावाही काहीजणांनी घेतला. सांगली- पेठ नाका हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे हस्तांतरित होणार असल्याचे काहीजणांनी सांगितले. त्यावर काहीजणांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण होण्यासाठी जनरेटा लावतानाच रस्त्याचे काम नव्याने सुरू करण्यासाठी पुन्हा आंदोलन उभारण्याचा सल्ला दिला, तर काहीजणांनी या रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे सुचविले.
सांगली- पेठ नाका व सांगली- कोल्हापूर यासह सांगली शहराला जोडणार्या प्रमुख रस्ते व महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची कामे संबंधित विभागांनी तातडीने हाती घेऊन ती येत्या दोन महिन्यात पूर्ण केली नाहीत, तर या सर्वच रस्त्यांना नववर्षाच्या सुरूवातीला सत्ताधारी राजकीय नेत्यांची नावे देण्याचा ठराव करण्यात आला. त्यात या रस्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार, आमदार व महापौर यांची नावे देऊन निषेध करण्याचे ठरले. याशिवाय या रस्ते कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने संबंधित ठेकेदाराकडून दर्जाहीन काम होते. या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तज्ञ व्यक्तींची एक समिती गठीत करण्याचा निर्णयही झाला.