भीक मागणा-या मुलीवर बलात्कार
गेल्या काही दिवसापासून एक महिला बशीरगंज भागात भीक मागून आपली उपजिविका भागवत असे. महिलेसोबत तिची 12 ते 13 वर्षाची मुलगी राहत असे. या मुलीवर या भागातील नराधम शेख जावेद शेख सलीम याने सातत्याने बलात्कार केला. यातून ही मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी मुलीच्या आईने बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी शेख जावेद याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला शहर पोलीसांनी जेरबंद केले.
