पुरूष हक्क दिनानिमित्त रॅली
औरंगाबाद, दि. 21, नोव्हेंबर - आता पुरूष मुक्तीचेे दिवस आले आहेत याची जाणीव करून देताना जागतिक पुरूष हक्क दिना निमित्त पत्नी पीडित पुरूष आघाडीच्या वतीने एक अनोखी रॅली काढण्यात आली. या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले. रॅलीत सहभागी झालेल्या सवारनी विविध मुखवटे चेहर्यावर लावून आपल्या व्यथा मांडल्या.
जागतिक पुरूष दिनाचा विजय असो, पुरूष आयोग स्थापन करा, एकतर्फी कायदे बंद करा, अशा घोषणा देण्यात आल्या. सर्व क्षेत्रात महिला व पुरूष समानता आहे. महिलांना मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य, हक्क मिळालेले असताना त्याचा गैरवापर त्या करीत आहेत. पुरूषांना खोट्या केसमध्ये अडकविले जात आहे. पुरुषांना कोणाकडेही दाद मागता येत नाही, अशा भावना र ॅलीत सहभागी झालेल्या पुरुषांनी व्यक्त केल्या.
सिडको बसस्टँड येथून सुरू झालेली रॅली आकाशवाणी, क्रांतीचौक, सिल्लेखाना चौक, सावरकर चौक, निरालाबाजार, औरंगपुरा, मिलकॉर्नरमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर समारोप झाला.
