खंडोबा यात्रेला शुक्रवारपासून सुरूवात, जय्यत तयारी
औरंगाबाद, दि. 21, नोव्हेंबर - सातारा खंडोबा यांच्या यात्रेला शुक्रवारपासून (दि. 24) सुरूवात होणार आहे. आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. सकाळी ग्रामस्थांच्या हस्ते आरती करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला, अशी माहिती मंदिराचे पुजारी विशाल धुमाळ यांनी दिली.
दरवर्षी प्रति जेजूरी असलेल्या सातारा येथील खंडोबा यात्रेला मराठवाड्यासह राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. मुख्य यात्रा चंपाषष्टीला (दि.24) सुरूवात होणार आहे. आता सातारा गाव महानगरपालिका क्षेत्रात आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी आठ दिवसांपूर्वी खंडोबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. त्यावेळी भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी नागरी सुविधा पुरविण्याचे आदेश मनपा अधिका-यांना दिले होते.
