Breaking News

२१ नोव्हेंबरला स्पीच फॅार सक्सेस व इव्हेंट मॅनेजमेंट मार्गदर्शन

अहमदनगर : आजकालच्या मार्केटींगच्या युगात सभाधीटपणा व बोलण्याची कला अवगत असणे आवश्यक बनले आहे. याशिवाय प्रत्येक गोष्ट इव्हेंटप्रमाणे साजरी करण्याची प्रथा पडतचालली आहे. नव्या युगातील यशस्वी होण्याचा मंत्र विद्यार्थ्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना समजावा यासाठी बीपीएचई सोसायटीच्या आय.एम.एस.संस्थेने दि.२१ नोव्हेंबर रोजीदुपारी ४ वाजता सीडसी सभागृहात स्पीच फॉर सक्सेस व इव्हेंट मॅनेजमेंटबाबत विशेष संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

या कार्यक्रमात पुण्यातील प्रसिध्द प्रेरणादायी व्याख्यात्यानॅन्सी कट्याल व इव्हेंट मॅनेजमेंट विषयाच्या कोर्स कोऑर्डिनेटर सुमिरा चंडोक मार्गदर्शन करणार आहेत. आय.एम.एस.संस्थेत चालविण्यात येणार्‍या इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सच्या सहाव्याबॅचच्या यशस्वीतेनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम आजी माजी विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य गृहिणी, व्यावसायिक, नव उद्योजक अशा सर्वांसाठी खुलाआहे, अशी माहिती आयएमएसचे संचालक डॉ.एम.बी.मेहता यांनी दिली.

आयएमएस संस्थेने नाविन्यपूर्ण व काळानुरुप शिक्षणावर नेहमीच भर दिला आहे. यातूनच चार वर्षांपासून संस्थेत इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स चालवला जातो. आतापर्यंत या कोर्सचा सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी फायदा घेतला आहे. यातील अनेकांनी चांगल्या नोकरीबरोबरच स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. या कोर्सची सहावी बॅच यंदा झाली असून यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात सर्वांना खास मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळणार आहे.