Breaking News

पारोळ्याच्या श्री बालजींच्या हुंडीत तीन लाखांचे दान

जळगाव, दि. 08, नोव्हेंबर - पारोळा येथील श्री बालाजी मंदिरात दानशूर भाविकांकडून तीन लाख रुपये, चार ग्रॅम सोने, तीन भार चांदी, 100 डॉलर असा ऐवज दान केला.  बालाजी मंदिर प्रशासनाकडून रोजी सील केलेल्या दानपेटीतून दानशूर भक्तांकडून केलेल्या दान मोजण्यात आले.
सहा तास विश्‍वस्त, बालाजी स्वयंसेवक समिती सदस्य यांनी पैसे मोजले. यात दोन लाख 96 हजार रुपये रोकड, चार ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन भार चांदी 100 डॉलर असे होते.  पाच महिन्यात भाविकांकडून दानपेटीत हे दान टाकण्यात आले होते.