देशातील नोटाबंदीचा चीनला सर्वाधिक फायदा
सांगली, दि. 09, नोव्हेंबर - केंद्र शासनाच्या नोटाबंदी निर्णयाचा सर्वाधिक लाभ चीनला झाला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता प्रचंड हवालदिल झाली असून लघु उद्योग मोडीत निघाले आहेत. छोटे व्यापारी व उद्योजक देशोधडीला लागले असून गत तीन वर्षात चीनमधून आयात वाढली आहे, असा आरोप हरियाणा माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा यांनी केला.
सांगली जिल्हा काँग्रेसच्यावतीने विश्रामबाग येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर आयोजित जन आक्रोश मेळाव्यात भुपेंद्रसिंह हुड्डा बोलत होते. नोटाबंदीच्या अवसानघातकी निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जिंकली. मात्र आता वर्षभरानंतर या निर्णयाचे दुष्पपरिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. त्यावेळी भाजपने नोटाबंदी निर्णयामुळे विजयाचा दावा केला होता. वास्तविक, या निर्णयाचे दाहक वास्तव आता समोर येत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकरी, कामगार, शेतमजूर व अन्य घटकांचे अर्थकारण बिघडले आहे. काँग्रेस व भाजपच्या निर्णयांची तुलना केली असता भाजपने चुकीच्या निर्णयामुळे या देशाची कोणत्या पध्दतीने वाट लावली, याचा खुलासा आपसूक होईल. वीज, पेट्रोल व डिझेलच्या दरातील सततची वाढ व शेतीमालाच्या दरातील घसरण पाहता या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे, असा आरोपही भुपें द्रसिंह हुड्डा यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष खासदार अमित शहा हा देशच विकायला निघाले आहेत, असा आरोप करून मोहन प्रकाश म्हणाले, की भाजप अथवा भाजप नेत्यांच्या भुलथापांना आता जनतेने बळी पडू नये. यापुढील कालावधीत काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनीही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी भाजप हटवा, देश वाचवा, अशी चळवळ उभारण्याची गरज आहे. अशोक चव्हाण यांनी जोपर्यंत महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करीत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, अशी गर्जना करून याची सुरूवात सांगली येथील जन आक्रोश मेळाव्यातून आपण करीत असल्याचे सांगितले.