श्रीगोंदा तालुक्यातील अपहरण झालेल्या मुलाचे गूढ अजूनही गुलदस्त्यात ?
श्रीगोंदा/प्रतिनिधी/ ;- श्रीगोंदा तालुक्यातील भिंगान खालसा येथील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याचा प्रकार घडून तब्बल एक आठवडा उलटला असला तरीही श्रीगोंदा पोलिसांना त्या मुलाच्या अपहरणाचे गूढ उलघडण्यास अद्यापही यश आलेले नाही मात्र यावर पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नसल्यामुळे त्या मुलाच्या अपहरणाचे गूढ अजूनही गुलदस्त्यात आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील भिंगानं खालसा येथील बापू पारखे यांना दोन मुले आहे. त्यापैकी एकाचे नांव वैभव बापू पारखे असे ठेवले. मात्र (दि़ १३) च्या सायंकाळी ४ते ५ च्या सुमारास वैभव हा घराच्या अंगणात खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले.सगळीकडे शोधाशोध करूनही तो मिळत नसल्यामुले याबाबत वैभवचे वडील बापू पाखरे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनेला तब्बल एक आठवडा उलटला तरी त्याचा अद्याप तपास लागू शकलेला नाही.त्यामुळे शंका- कुशंका चे उधाण माजले आहे. त्याचे अपहरण झाले कि संपत्तीच्य वादातून किंवा नरबळीसाठी वैभवचे अपहरण करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेला तब्बल एक आठवडा उलटला तरी त्याचा अद्याप तपास लागू शकलेला नाही.त्यामुळे शंका- कुशंका चे उधाण माजले आहे. त्याचे अपहरण झाले कि संपत्तीच्य वादातून किंवा नरबळीसाठी वैभवचे अपहरण करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.मात्र त्याच्या जवळील नातेवाईक यामध्ये सामील असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात होते . मात्र अद्यापही पोलिसानी कोणतीही ठोस कारवाई करवून या अपहरणाच्या गुन्ह्याचा उलगडा करू शकले नाहीत सध्या त्या मुलाच्या नातेवाईकाकांकडे चौकशी चालू असून याबाबत कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
त्यामुळे या अपहरणाचे बिंग कधी फुटेल, आणि खरा आरोपी कधी जेरबंद होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मात्र या अपहरणात त्याच्या घरातीलच व्यक्ती सामील असण्याची शक्यता पोलीस वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. मात्र आरोपी अजूनही अटक झाली नसल्यामुळे याबाबत नागरीकातून मोठ्या प्रमाणात शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.