ऊस वाहतुकीमुळे रस्ते खचले;प्रवास झाला जीवघेणा.
बारडगाव सुद्रिक येथील अंबालिका साखर कारखान्याला जोडणाऱ्या रस्त्यांची सध्या खूपच बिकट अवस्था झाली आहे.ट्रॅक्टर,ट्रक तसेच बैलगाडीने प्रमाणापेक्षा जास्त उसाची भरती करुन वाहतुक केली जात आहे.खेड- करमनवाडी-अंबिकानगर तसेच भांबोरा-राशीन वरुन अंबिकानगरकडे येणाऱ्या रस्त्याला अवकळा आली आहे.खेड,औटेवाडी,राजेगाव तसेच पुणे जिल्ह्यातील उसाची वाहतूक याच मार्गावरून होते. जड वाहतूकीमुळे मुख्य रस्ते खचुन त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.
एक-दिड फुट खोल पडलेल्या खड्ड्यातून वाहनेच बाहेर निघत नसल्याने डांबरीकरण रस्त्यावर मुरुम टाकुन खड्डे बुजविण्यात आले.मात्र रस्त्यावर टाकलेल्या मुरमाच्या ढिगावरुन वाहने गेल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले दिसते.खेड- करमनवाडी रस्त्याच्या साईडपट्ट्या तसेच रस्ताही जागोजागी खचल्याने उसाचे ट्रेलर पलटी होण्याचे प्रमाण वाढले आहे.रस्त्यावर पडलेल्या उसाच्या ढिगामुळे वाहतुकीला अडथळे येतात.या भागातून खेड,भिगवण,बारामतीला प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
◾रिफ्लेक्टर,गतीरोधक,माहितीफलकांचा अभाव
खेड-अंबालिका कारखाना मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन अद्याप एकही माहिती फलक बसविलेला नाही.वेगमर्यादा,दिशादर्शक फलक तसेच गतीरोधक बसविण्यात आलेले नाहीत.तसेच ट्रेलरच्या मागील बाजुस रिफ्लेक्टर बसविले नसल्याने अंधारात अपघाताचा धोका वाढला आहे.
ऊसाच्या वाहतुकीने रस्ता सतत वर्दळीचा असतो.प्रमाणाहुन अधिक भरलेल्या ऊसाचा ट्रेलर ओलांडताना ट्रेलरमधुन ऊस तसेच ट्रेलर पलटी होण्याची भिती वाटते.वा -अश्विनी सुळ,विद्यार्थीनी. -----
करमनवाडीहुन खेडला दररोज शिक्षणासाठी जावे लागते.वाहनातील कर्णकर्कश आवाज व धुळीचा आम्हाला खुपच त्रास होतो . -मोनाली पवार,विद्यार्थीनी,करमनवाडी