Breaking News

डॉ. आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

जळगाव, दि. 07, मार्च - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र असणा-या विदयार्थ्यांना या योजनेतंर्गत सन 2017-18 साठी अर्ज करण्यास 15 मार्च, 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती खुशाल गायकवाड, सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी दिली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दहावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसुचीत जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन निवास व इतर सुविधा उपलब्ध करुन देणेसाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वाधार योजना सुरु केलेली आहे.
या योजनेच्या लाभासाठी पात्र असणा-या विदयार्थ्यांनी यापूर्वी दिलेल्या सुचनेनुसार विद्यार्थ्याने त्याच्या रहिवाशी जिल्ह्यामध्ये (विद्यार्थी जिल्हा) या योजनेसाठी अर्ज करावयाचा होता. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहे (कॉलेज जिल्हा) त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करता येणार आहे.