राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिका मुख्यालयासमोर चाबूकफोड आंदोलन
सांगली, दि. 18, नोव्हेंबर - सांगली महापालिका क्षेत्रातील विविध विकाडे गत दोन वर्षापासून सत्ताधारी काँग्रेस व प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत विरोधी सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी महापालिका मुख्यालयासमोर चाबूकफोड व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष नगरसेवक संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त रविंद्र खेबूडकर यांना देण्यात आले. तत्पूर्वी महापालिका मुख्यालयासमोर महापालिका प्रशासनाविरोधात शंखध्वनी करण्यात आला.
गत दोन वर्षापासून महापालिका क्षेत्रातील सर्वच विकासकामे ठप्प आहेत. सत्ताधारी काँग्रेस पदाधिकारी व महापालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक ही विकासकामे अडवली जात असून याचा सर्वसामान्य सांगलीकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या या ढिम्म कारभाराविरोधात सांगलीकरांतून तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत संबंधितांना वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संजय बजाज यांनी केला.
सत्ताधारी काँग्रेस व महापालिका प्रशासन यांच्यातील वादामुळेच मोठ्याप्रमाणात विकासकामे रेंगाळली आहेत. विविध विकासकामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सहा- सात महिने होत आले तरी निविदा उघडल्या जात नाहीत. याशिवाय वर्कऑर्डर देण्यासही जाणीवपूर्वक विलंब लावला जात आहे. गत दोन वर्षापासून अनेक विकासकामांचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीअभावी पडून आहेत. त्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष दिले जात नाही.

महापालिकेतील विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या प्रभागातील अनेक विकासकामेही जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जात आहेत. याविरोधात ढिम्म महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज चाबूकफोड आंदोलन करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आल्याचे संजय बजाज यांनी सांगितले.