संपादकीय - शोषित धर्माचे क्रिया कर्म....!
भारतीय समाज व्यवस्थेने सामावून घेतलेल्या विविध धर्म पंथांच्या भाऊ गर्दीत हिंदू धर्माविषयी नेहमीच वादंग निर्माण होतो.परधर्मियांनी काढलेल्या खोडीपेक्षा स्वधर्मीपणाचा प्रासंगीक ठेका धरणार्या कथित विद्वानांच्या कुरापती या वादंगाला कारणीभूत ठरतात.असे म्हटले तर कुणाच्या धर्म किंवा जात भावना दुखावण्याचे निमित्त ओढवून घेऊ नये.कथित हिंदू धर्मात असलेली जात व्यवस्थेची उतरंड आणि त्यातून जाणीवपूर्वक निर्माण केली गेलेली श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना या वादंगाचे मुळ आहे.
हिंदू हा धर्म आहे की नाही या वादात जाण्याऐवजी आज अस्तित्वात असलेल्या कथित हिंदू धर्माच्या जात उतरंडीचा परामर्श घेतला,उच्च निचत्वाचा हिशेब मांडला तरी कथित हिंदू धर्माच्या ठेकेदारांची थोबडे पांढरे पडतील.
सध्या दशक्रिया या चिञपटाच्या प्रदर्शनावरून एका विशिष्ट जात समुहाने आवघा हिंदू धर्म खतारे मे ची बोंब मारण्यास सुरूवात केली आहे.असे आहे तरी काय या चिञपटात...? या प्रश्नाच्या उत्तराने हिंदू धर्म खतरे मे की बोंबाबोंब करणार्या धर्म ठेकेदारांची टोळी संकटात यावर प्रकाशझोत पडणार आहे.
हजारो वर्षापासून सुरू असलेली परंपरा आणि त्या परंपरेवर सुरू असलेली दुकानदारी या चिञपटाच्या प्रदर्शनानंतर काही अंशी का होईना बंद होऊ शकतेही भीती वाटत असल्याने बेंबीचा देठ फुगला अन् तेथून चिञपटावर बंदी आणण्याची गरळ ओकण्यास सुरूवात झाली.
समाजातील घातक,समाजाची लुट करणार्या परंपरांना लक्ष्य करणे कुठल्याही कायद्याने गुन्हा ठरत नसतांना अशा कथानकांची मुस्कटदाबी करण्याचा हीन प्रयत्न या काळात कुखपविला जाणार नाही.
राहीला प्रश्न धर्माचा,या चिञपटात बोंबा मारल्या जात असल्याप्रमाणे हिंदूच काय कुठल्याही धर्मावर टिप्पणी केलेली नाही.दुष्प्रवृत्ती मग त्या कुठल्याही धर्मात असोत त्यांना टार्गेट करणे हे सत्कार्य आहे.वादाला कारणीभूत ठरलेल्या चिञपटाने ज्या प्रवृत्तीवर हल्ला केला त्या प्रवृत्ती केवळ बोंबाबोंब करणार्या समुहातच आहेत का? तर नाही सर्व जात पंथ धर्मात त्यांचा माज आहे.मग मिरची इकडेच कशी झोंबली?
अशा प्रवृत्तीवर अस्तित्व संकट कोसळण्याचे संकेत मिळू लागले की अवघा हिंदू धर्म धोक्यात असल्याची हाकाटी पिटली जाते.कर्मकांडाच्या नावाखाली मानसिक आर्थिक लूट करून त्याच धर्मातील भोबड्यांना लुटले जाते तेंव्हा हा धर्म सुरक्षित असतो का? सोहळ्याच्या नावावर एका बहुजृन मराठा बाईवर खोटा गुन्हा दाखल करून मानसिक यातना दिल्या जातात तेंव्हा हा धर्म अधिक बळकट होतो का? हिंदवी स्वराज्याचे दैवत राजा शिव छञपती,घटनाकार डा.बाबासाहेब आंबेडकर यांचा खोटा इतिहास प्रसविणार्या प्रवृतींचे उदात्तीकरण केले जाते

विषय निघालाच आहे तर दशक्रियाच्या कथा सारांश समजून घ्यायला हरकत नाही.वर्षानूवर्ष मृत्यू क्रिया कर्म करणार्या किरवंत नामक ब्राम्हण समाजाच्या एका पोटजातीतील पाञा भोवती चिञपटाचे कथानक गुंफलेले आहे.रूढी परंपरांचा बाऊ करून गोर गरीब ,भोळ्याभाबड्या अशिक्षित अन् सुशिक्षितही समाजाला खोटी भीती दाखवून विविध धर्म क्रिया करण्यास भाग पाडणार्या प्रवृत्तीवर हा चिञपट प्रकाश टाकतो.
हजारो वर्षापासून सुरू असलेली परंपरा आणि त्या परंपरेवर सुरू असलेली दुकानदारी या चिञपटाच्या प्रदर्शनानंतर काही अंशी का होईना बंद होऊ शकतेही भीती वाटत असल्याने बेंबीचा देठ फुगला अन् तेथून चिञपटावर बंदी आणण्याची गरळ ओकण्यास सुरूवात झाली.
समाजातील घातक,समाजाची लुट करणार्या परंपरांना लक्ष्य करणे कुठल्याही कायद्याने गुन्हा ठरत नसतांना अशा कथानकांची मुस्कटदाबी करण्याचा हीन प्रयत्न या काळात कुखपविला जाणार नाही.
राहीला प्रश्न धर्माचा,या चिञपटात बोंबा मारल्या जात असल्याप्रमाणे हिंदूच काय कुठल्याही धर्मावर टिप्पणी केलेली नाही.दुष्प्रवृत्ती मग त्या कुठल्याही धर्मात असोत त्यांना टार्गेट करणे हे सत्कार्य आहे.वादाला कारणीभूत ठरलेल्या चिञपटाने ज्या प्रवृत्तीवर हल्ला केला त्या प्रवृत्ती केवळ बोंबाबोंब करणार्या समुहातच आहेत का? तर नाही सर्व जात पंथ धर्मात त्यांचा माज आहे.मग मिरची इकडेच कशी झोंबली?
अशा प्रवृत्तीवर अस्तित्व संकट कोसळण्याचे संकेत मिळू लागले की अवघा हिंदू धर्म धोक्यात असल्याची हाकाटी पिटली जाते.कर्मकांडाच्या नावाखाली मानसिक आर्थिक लूट करून त्याच धर्मातील भोबड्यांना लुटले जाते तेंव्हा हा धर्म सुरक्षित असतो का? सोहळ्याच्या नावावर एका बहुजृन मराठा बाईवर खोटा गुन्हा दाखल करून मानसिक यातना दिल्या जातात तेंव्हा हा धर्म अधिक बळकट होतो का? हिंदवी स्वराज्याचे दैवत राजा शिव छञपती,घटनाकार डा.बाबासाहेब आंबेडकर यांचा खोटा इतिहास प्रसविणार्या प्रवृतींचे उदात्तीकरण केले जाते
तेंव्हा या धर्मावर संकट येत नाही का?बाळांनो! तुम्ही ज्यांच्या बळावर आजवर धर्मशासन केले तो बहुजन समाज आज शहाणा झाला आहे.रूढी परंपरांच्या नावावर शोषण तो आता मान्य करायला तयार नाही,आणि धर्माच्या फाजील तत्वज्ञानालाही फेटाळून वास्तव व जीवनाला अर्थ देणार्या धर्माची कास त्याने धरली आहे,याच मार्गाने बहुजन समाने शोषण आणि शोषितांचे क्रियाकर्मही उरकले आहे.सुज्ञास अधिक सांगणे न लगे!