Breaking News

राष्ट्रीय महामार्ग चौकातून जाणारे रस्ते दुरुस्त करा

अहमदनगर, दि. 10, नोव्हेंबर - शहराला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्ग चौकातून जाणारे रस्ते हे अत्यंत खराब स्थितीत असून जागोजागी लहान मोठे खड्डे ंपडलेले आहेत. या  ठिकाणी अनेकदा वाहतुक सुरु असताना अपघात होतात तरी सार्वजनिक बांधकाम विभाग (महामार्ग)कार्यकारी अभियंता यांनी त्वरीत लक्ष घालून राष्ट्रीय महामार्ग चौकातून जाणारे  रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी महानगरपालिकेच्या महापौर सुरखा कदम यांनी निवेदनाव्दारे केले आहे. 
महापौरांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, अहमदनगर शहराला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्ग चौकातून जाणारे रस्ते हे अत्यंत खराब झालेले असून जागोजागी मोठे खड्डे  पडलेले आहेत. या रस्त्यावरून सतत लहान मोठी वाहतुक मोठ्या स्वरुपात सुरु असल्याने खड्डेमय रस्त्यामुळे लहान मोठे अपघात होतात. रस्त्यामुळे नागरिक व वाहन चालकांना  त्रास होत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी इकडे येत असून याबाबत आपल्या कार्यालयाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली दिसून येत नाही. तरी आपण लवकरात लवकर  शहरातून जाणार्‍या नगर औरंगाबाद रोड डीएसपी चौक तारकपूर स्टँड ते पत्रकार चौकाकडे जाणारा रस्ता, स्टेशन रोड ते कायनेटीक चौक, हॉटेल संजोग ते नागापूर चौक  एमाआयडीसी लगत असलेला रस्ता, स्टेट बँक चौक ते एस.टी.स्टँड चौक, सक्कर चौक ते केडगाव बस स्टॉप पर्यंत असलेला रस्ता तातडीने दुरुस्त करुन नागरीकांना दिलासा द्यावा  अशी मागणी केली आहे.
शहरामधुन जाणार्‍या अनेक रस्त्यांची अवस्था ही दैयनीय झाली असून त्याची डागडुजी व खड्डे बुझविण्याची प्रक्रिया पार पाडणे गरजेचे आहे. शहरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी  तसेच शहरातील नागरीकांना महामार्गावरुन त्रास होणार नाही अशा पध्दतीने रस्त्याची डागडुजी झाली तर शहरातील वाहतुक कोंडी आणि शहरातील नागरीकांचे हाल होणार नाही. वि विध महामार्ग हे खड्डेमूक्त केले तर वेळोवेळी होणारे अपघात होणार नाही. वेळोवेळी अनेक नागरीकांनी रस्त्याच्या तक्रारी केल्या असल्याने मनपाच्या वतीने निवेदन सादर करण्यात  आले आहे.