Breaking News

कोपर्डी खटल्याची सुनावणी आता दि.18 रोजी

अहमदनगर, दि. 10, नोव्हेंबर - कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणातील आरोपींच्यावतीने आज अ‍ॅड.प्रकाश आहिरे यांनी युक्तीवादा संदर्भातील लेखी म्हणणे न्यायालयासमोर सादर के ले आहे. आरोपीला या खटल्यातून वगळावे असा युक्तीवाद केला. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावली आता दि.18 नोव्हेंंबरला ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश  सुवर्णा केवले यांनी दिली आहेत. 
कोपर्डी येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणाविषयी येथील न्यायालयामध्ये सध्या खटला सुरु आहे. काल आरोपी तीन यांच्यावतीने अ‍ॅड.प्रकाश आहिरे यांनी बाजू मांडली होती.  अंतीम युक्तीवाद संपला असून आज आहिरे यांनी आरोपी नितीन भैलुमे हा शिकत असून त्याला त्याचे शिक्षण पुर्ण करायचे आहे. या आरोपीच्या वतीने संदर्भात कोणतेही असे ठोस  पुरावे सादर झालेले नाही त्याला विनाकारण यामध्ये गोवले गेले आहे.  त्याची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करावी असा युक्तीवाद अ‍ॅड.आहिरे यांनी करुन घटनेनुसार प्रत्येकाला  न्याय मिळण्याचा अधिकारी आहे. त्यानुसार विचार व्हावा तसेच एका साक्षीदार मुलीने घटनेपुर्वीची जी दमदाटी झाली असे सांगितले. त्याची माहिती तीने तीच्या आईला दिली होती  मात्र, या खटल्यामध्ये त्यांची साक्ष घेण्यात आली नाही. असे त्यांनी युक्तीवादात म्हटले आहे. तसेच अ‍ॅड.आहिरे यांनी युक्तीवादातील लेखी म्हणणे आज न्यायालयासमोर सादर केले  आहे. तर इतर दोन आरोपींच्यावतीने सुध्दा अशाच प्रकारचे म्हणणे न्यायालयात सादर झाल्यानंतर यावर सरकारी पक्षाचा युक्तीवाद विशेष सरकार वकील अ‍ॅड.उज्वल निकम हे क रणार आहे.
दरम्यान, कोपर्डी खटल्याची अंतीम युक्तीवाद पुर्ण झाला असून या खटल्याची पुढील तारीख दि.18 नोव्हेंबर ठेवण्यात आली असून साधारणता यावेळी युक्तीवाद होऊन दोषारोप  निश्‍चित होऊ शकतात अशी शक्यता आहे.