Breaking News

तपासणी करणा-या पथकाचीच चौकशी करण्याचा अहवाल

नांदेड, दि. 25, नोव्हेंबर - नांदेड जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामाची तपासणी करणार्या बीडच्या चौकशी पथकाचीच चौकशी करण्याचा अहवाल जिल्हाधिकार्यानी विभागीय आयुक्तांकडे पाठविल्याने खळबळ उढाली आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील पथकाने 21 मार्च 2017 रोजी लोहा तहसील तसेच शासकीय धान्य गोदाम येथील एपीएल शेतकरी लाभार्थी अभिलेख तपासणी केली़ 



या पथकाने विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा विभागाच्या उपायुक्तांकडे 9 जून 2017 रोजी आपला अहवाल सादर केला होता़ त्या संदर्भात कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले होते़ या चौकशी पथकाने मंजूर नियतन आदेशाप्रमाणे गोदामामध्ये धान्य प्राप्त होत नसल्याचे म्हटले होते़ प्रत्यक्षात डीओनुसार धान्य वितरण होत असल्याचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे़ 

बीडच्या चौकशी पथकास लोहा येथे धान्य वितरणाचे अभिलेख उपलब्ध करून दिले असता या पथकाने फक्त शासकीय धान्य गोदाम येथील अभिलेखांची पाहणी केली़ परंतु तहसीलच्या कोणत्याच अभिलेखांची पाहणी केली नाही़ ही बाब निदर्शन आणून दिल्यानंतरही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही़ असाच प्रकार जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही घडला असल्याने बीडच्या चौकशी पथकाच्या हेतूवर जिल्हाधिकार्यांनी आक्षेप नोंदवला आहे़ विभागीय आयुक्तांकडे पथकाच्याच चौकशीचा अहवाल जिल्हाधिकाजयांनी पाठवला आहे़