सारसनगर हे शहरामध्ये विकासाचे मॉडेल ठरले - आ. जगताप
अहमदनगर, दि. 10, नोव्हेंबर - सारसनगरमधील नागरिक गेल्या 7 वर्षांपूर्वी या भागातून नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे या भागात विकासाला चालना देण्यात आली. आज सारसनगरमधील सर्व विकासकामे मार्गी लावली आहेत. दर्जेदार रस्ते केले आहेत. त्यामुळे या भागात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फेज-2 पाणीयोजनेचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पूर्ण दाबाने या परिसरातील नागरिकांना पाणी मिळेल. सारसनगर हे शहरामध्ये विकासाचे मॉडेल ठरले आहे. त्याप्रमाणे शहरातील उपनगरांच्या विकासाला आमदारकीच्या माध्यमातून चालना देत आहोत, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सारसनगरमधील बाकलीवाल कॉलनीत रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. जगताप बोलत होते. याप्रसंगी ज्ञानदेव पांडुळे, प्रकाश भागानगरे, सुरेश आंबेकर, छबूराव कांडेकर, महादेव कराळे, भाऊसाहेब पांडुळे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले की, नागरिक विकासकामांसाठी लोकप्रतिनिधींबरोबर उभे राहिल्यास विकास होतो. काम करण्यास वेगळा आनंद मिळतो. सारसनगरमधील सर्व रस्ते डांबरीकरणाने व काँक्रिटीकरणाचे जोडण्याचा आपला प्रयत्न आहे.