Breaking News

बाबा बंगाली भागात ड्रेनेज तुंबले ; मैलामिश्रीत पाणी रस्त्यावर

अहमदनगर, दि. 10, नोव्हेंबर - झेंडीगेट येथील बाबा बंगाली परिसरात अस्वच्छता तसेच ड्रेनेज तुंबले ंअसून मैलामिश्रीत पाण्याने दुर्गंधी पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले  असताना, मनपा प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने मुजाहिद (भा) कुरेशी यांनी महापालिकेत अति.आयुक्त विलास वालगुडे यांच्या वाहना समोर महापालिकेत ठिय्या मांडून,  या परिसराची पहाणी करण्यास भाग पाडले. यावेळी सिटी इंजी. सोनटक्के, इंजी. पारखे, उबेद शेख, नदिम शेख, इरफान सय्यद, मतीन तांबोली, युनुस तांबोली, रिजवान मोमीन,  सरवर कुरेशी, नाजीर शेख, शोएब शेख, मुज्जफर कुरेशी, निसार कुरेशी, रशिद कुरेशी आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.बाबा बंगाली परिसरात पसरलेली अस्वच्छतेची  अति.आयुक्त वालगुडे यांनी पहाणी करुन नागरिकांचे प्रश्‍न जाणून घेतले.
तसेच संबंधीत अधिकार्यांशी संपर्क साधून तातडीने स्वच्छता करण्याचे सुचना केल्या. सदर परिसरात वारंवार गटार तुंबन मैलमिश्रीत घाणी पाणी रस्त्यावर येत आहे.
महापालिकेला सदर प्रश्‍नासंदर्भात वारंवार सुचना करुन उपाययोजना होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या परिसरात साथीचे आजार पसरले असून, नागरिकांचे आरोग्य  धोक्यात आले आहे. यावर तातडीने उपाय योजना न झाल्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.