Breaking News

मावळत्या नाराज सभागृह नेत्यांच्या अनुपस्थितीतच सेनेच्या नव्या नेत्यांनी घेतला पदभार

औरंगाबाद, दि. 07, नोव्हेंबर - नाराज मावळत्या महापालिका सभागृहनेेते अनुपस्थित असताना अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विकास जैन यांनी सभागृह नेतेपदाचा पदभार  स्वीकारला. शिवसेना नेत्यांनी महापौरपदाची माळ नंदकुमार घोडेले यांच्या गळ्यात घातली. या पदासाठी इच्छुक असलेले विकास जैन यांची सभागृहनेतेपदी वर्णी लावण्यात आली.  मुदतीपूर्वीच पद काढल्याचे पत्र मनगटे यांना देण्यात आले होते. पूर्वसुचना न देता, नेत्यानी हा निर्णय घेतला. त्यामुळे मनगटे नाराज असल्याचे बोलले जात होते. ती नाराजी आज  पदभार या निमित्ताने उघड झाली. सभागृह नेतेपदाचा पदभार समारंभ मोठ्या थाटात आज महापालिकेत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला शिवसेना पदा धिकारी व राजकीय पुढार्यांची मोठी गर्दी होती. खा. खैरे नेहमीप्रमाणे उशिरा आल्याने शिवसैनिकांना ताटकळत त्यांची तब्बल पाऊणतास वाट पहावी लागली. माजी सभागृह नेते  गजानन मनगटे यांचा 2 महिन्यांचा कार्यकाळ बाकी असताना तातडीने मनपाच्या सभागृहनेतेपदावर माजी महापौर विकास जैन यांची वर्णी लावल्याने महापालिकेत चर्चेला उधाण आले  होते.