Breaking News

फुकट्या 82 हजार प्रवाशांवर रेल्वेची कारवाई

पुणे, दि. 07, नोव्हेंबर - फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा धडाका मध्य रेल्वेने सुरुच ठेवला असून पुणे विभागाने एप्रिल ते ऑक्टोबर 2017 दरम्यान विनातिकीट प्रवास क रणा-या तब्बल 82 हजार 500 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. या प्रवाशांकडून रेल्वेने चार कोटी 82 लाख रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान विनातिकीट प्रवास क रणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे रेल्वेचे नुकसान होत आहे. प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करताना तिकीट काढूनच प्रवास करावा व दंडात्मक कारवाई टाळावी, असे  आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी केले आहे.