Breaking News

नितीन आगे हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा


जामखेड तालुक्यातील खेडी येथील १७ वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दहाही आरोपीना पुराव्या अभावी सुटका केली गेली. या प्रकरणी सर्वांची नार्कोटेस्ट करून सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी आरपीआय (आठवले गट) संगमनेर तालुक्याच्या वतीने आज पो. नि. गोकुळ औताडे तसेच नायब तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

२८ एप्रिल २०१४ रोजी नितीन राजू आगे याची हत्या करण्यात आली होती. नितीन याला आरोपींनी शाळेतून मारहाण करत आरोपीच्या वीटभट्टीवर नेवून तेथे अमानुष मारहाण केली होती. तसेच डोंगरातील झाडाला गळफास दिला होता. अशी फिर्याद जामखेड पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. न्यायालयीन कामकाजामध्ये सरकारी पक्षाकडून सर्वांना फितूर म्हणून जाहीर केले, यादरम्यान सर्व तपास अधिकाऱ्यांची नार्को चाचणी करावी तसेच खटल्यावर सीबीआय चौकशी नेमण्यात यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अशोक थोरात, राजवंतीबाई दारोळें, शुभम रोकडे, आशिष प्रभाकर शेळके यांसह आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस स्थानक व तहसिल कार्यालय परिसरात जमा होते.