Breaking News

तिकीट तपासणीसांकडून प्रवाशांना दिलेल्या अरेरावीच्या वागणुकीची रेल्वे व्यवस्थापनाकडून दखल

औरंगाबाद, दि. 10, नोव्हेबर - दक्षिण मध्य रेल्वेचे वाणिज्यिक व्यवस्थापक, तसेच तिकीट तपासणीसांकडून (टीटी) 2 नोव्हेंबर रोजी प्रवाशांना दिलेल्या अरेरावीच्या वागणुकीच्या  घटनांची प्रधान वाणिज्यिक व्यवस्थापक एन. डी. शेखरम् यांनी दखल घेतली असून तिकिट तपासणी निरिक्षकांसह अधिका-यांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी व्हिडिओ का ॅन्फरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधताना दिले. 
फुकटे प्रवासी, अनधिकृत विक्रेत्यांबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे नांदेड विभागातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर मोहीम राबवून कारवाईचा निर्णय घेतला होता.  त्यानुसार 2 नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 42 तिकीट निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बलाच्या 9 जवानांच्या मदतीने फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात  आली.