Breaking News

फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची मागणी

औरंगाबाद, दि. 10, नोव्हेबर - औरंगपु-यातील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याशेजारी सुशोभीकरण करण्यासह फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची मागणी महात्मा फुले स्मृति दिन आयोजन समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन महापौरांना देण्यात आले आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्याशेजारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात  यावा, अशी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. शहरात सावित्रीबाई यांचा एकही पुतळा नाही.. त्यामुळे 28 नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिनापूर्वी मनपा  प्रशासनाने औरंगपुरा भागात फुले दांपत्याचा पुतळा उभारून त्या भागाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी आहे.