परभणी शहरात ५ लाख ८५ हजारांचा गुटखा जप्त
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त, कोतवाली पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.२८) सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील दर्गारोड परिसरातील शेख रिजवान शेख फरीदमिया यांच्या राहत्या घरी छापा टाकला.
या ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थ, गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. यात गोवा, पानपराग, एक्का, विमल अशा विविध ब्रॅन्डचे एकूण २ हजार २६० पॅकेटस पथकाने जप्त केले. यांची एकूण किंमत ५ लाख ८५ हजार ७१६ आहे.