Breaking News

सचिन तेंडुलकर सोबत आता १० नंबरची जर्सीही झाली निवृत्त!

बीसीसीआयने अनौपचारिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून 10 नंबरची जर्सी निवृत्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने याबाबत टीम इंडियाच्या सीनियर खेळाडूंशी बातचीत केली आणि त्यावर एकमत झालं. या निर्णयानंतर आता संघाच्या दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला 10 नंबरची जर्सी घालता येणार नाही .



क्रिकेटच्या मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यात विक्रमांची शिखरं पादाक्रांत केली आहेत. या सगळ्या विक्रमांची साक्षीदार त्याची 10 नंबरची जर्सी आहे. दोन दशकांपेक्षा जास्त वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने 10 नंबरची जर्सी घालून भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन पोहोचवलं.

मुंबई इंडियन्सकडून 10 नंबरची जर्सी निवृत्त


तर दुसरीकडे सचिन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे. यावेळीही तो 10 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरत असे. पण 2013 मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर, मुंबई इंडियन्सने ही जर्सी अधिकृतरित्या निवृत्त केली आहे