बेल्जियमचे महाराजा फिलिप्पे, महाराणी मथिलदे यांचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. 10, नोव्हेबर - बेल्जियमचे महाराजा फिलिप्पे व महाराणी मथिलदे यांचे शिष्टमंडळासह येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज आगमन झाले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पुस्तक देऊन बेल्जियमचे महाराजा व महाराणी यांचे स्वागत केले.
यावेळी स्वागतासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्याम गोयल यांनी बेल्जियमचे महाराजा फिलिप्पे व राणी मथिलदे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.