Breaking News

श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ पेशवे स्मारकाच्या प्राथमिक आराखड्यास मान्यता

मुंबई, दि. 10, नोव्हेबर - श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ पेशवे स्मारकाच्या प्राथमिक आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी  देण्यात आली. श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ पेशवे यांचे स्मारक श्रीवर्धन (जि. रायगड) येथे उभारण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार  पडली. बैठकीस आमदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
या स्मारकासाठीचा विस्तृत आराखडा तयार करावा, असे सांगून स्मारकाचे काम नगरविकास विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  समन्वयातून करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. स्मारकाच्या आराखड्यानुसार संग्रहालय, ऑडिटोरियम आणि भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी मा हिती आमदार तटकरे यांनी दिली.